उचकी

उचकी

उचकी लागली ? कोणी आठवण काढली ? असे वाक्य लगेच आपल्या तोंडून येते. आणि कोणी बरे आठवण काढली असेल या विचारामध्ये आपण दंग होतो.

आपल्या छातीच्या पिंजर्‍याचा विभाजक पडदा ( डायफ्रॅम) स्नायूंनी बनलेला असतो.  कधी कधी अचानक या स्नायूंचे आकुंचन होते. ही क्रिया अनैच्छिक असते.  वारंवार आकुंचन झाल्याने, स्वरयंत्रणेतील पट्ट्या जवळ येतात व उचकी निर्माण होते.  उचकी काही काळासाठी ठराविक अंतराने येते व आपोआप बंद होते. मात्र काहींमध्ये उचकी दीर्घकाळ राहते.

उचकी रोखण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करतात. जसे पाणी पितात किंवा इतर उपाय करून पाहतात. आम्ही असे काही उपाय सांगणार आहेत, की त्याने उचकी छूमंतर होऊन जाईल.

उचकी रोखण्याचे काही उपाय :-

  • आपला श्वास रोखून ठेवा :  एक लांब श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. जाणकारांनुसार फुफ्फुसात कार्बन डायऑक्साईड भरेल आणि डायफ्राम त्याला काढण्याच प्रयत्न करेल तर उचकी आपोआप थांबेल.
  • साखर :  उचकी आल्यावर त्वरीत एक चमचा साखर खा. यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकल्यास ते थोडे थो़डे प्यायल्याने उचकी थोड्यावेळात बंद होते.
  • लिंबू आणि मध : उचकी आल्यावर एक चमचा लिंबूचा ताजा रस घ्या त्यात एक चमचा मध टाका आणि दोघांना मिक्स करून चाटण करा. हे चाटण घेतल्यावर उचकी बंद होईल.
  • हळूहळू जेवा :  अनेकवेळा फास्ट खाल्ल्याने उचकी लागते, जेवताना हळूहळू आणि चावून जेवा, असे केल्यास उचकी थांबते. फास्ट खाल्ल्याने किंवा तिखट खाल्याने उचकी लागते.
  • चॉकलेट पावडर :  जेव्हाही उचकीच्या समस्या झाली तर तुम्ही चॉकलेट पावडर एक चमचा खा. ती खाल्याने थोड्यावेळात उचकी बंद होते.
  • मीठाचे पाणी : थोडे मीठ पाण्यात टाकून घोट घोट प्या. यामुळे उचकीची समस्या त्वरीत बंद होते.
  • काळे मिरे :  तीन काळे मिरे आणि खडीसाखर तोडात ठेऊन चावा आणि त्याचा रस प्या. त्यावर एक घोट पाणी पण पिऊ शकतात. त्यानंतर उचकी बंद होईल
  • उलटे अंक मोजा :  जाणकारांनुसार उलटे अंक मोजल्याने अचानक त्या व्यक्तीला घाबरविल्यास त्याची उचकी जाते. उलटे अंक १०० ते १ असे माजावे.
  • टॉमॅटो : उचकी आल्यावर त्वरीत टॉमॅटोला धू दातांनी चावून का, उचकी ठीक होईल. उचकी आल्यास एक चमचा पीनट बटर खा. श्वास घेण्याच्या प्रक्रियेत बदल होईल आणि उचकी बंद होईल.
  • वेलची :  साधारण वेलचीच्या अख्ख्या दहा-बारा कुडय़ा घ्या व तव्यावर परतायला सुरुवात करा. चांगल्या परतल्यानंतर पोळपाट-लाटणं घेऊन त्या बारीक करून त्याची मशी तयार करा. मशी म्हणजे काळी पूड. पूर्वी बायका मशेरी भाजतात ना अगदी तसे करा. मग ती वेलचीची मशी दर दोन दोन मिनिटांनी मधासोबत चाटवा.
  • पाणी पिताना जर उचकी लागली असेल तेव्हा शक्य असेल तर डोके जमिनीच्या बाजूला वाकवून पाण्याचे घोट घ्या.

Leave a Reply