चेहऱ्यावरील डाग,सुरकुत्या

तजेलदार चेहरा

तुमच्या चेहऱ्यावर अवेळीच सुरकुत्या आल्यात का ? किंवा चेहऱ्यावर डाग,सुरकुत्या, पुरळ आली असल्यास घाबरून जाऊ नका. आम्ही तुम्हाला सांगतो काही नैसर्गिक उपाय. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या अवकाळी सुरकुत्या देखील नष्ट होतील शिवाय, तुमच्या चेहऱ्यावरील तेजदेखील वाढेल.

चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या घालवण्यासाठी उत्तम उपाय :-
  • चेहऱ्यावर मुरूम,पुटकुळ्या मुळे डाग पडल्यास बटाटे उकडून थंड करावे आणि सालासकट वाटून घ्यावेत. त्यात काकडीचा रस टाकून थोडासा लिंबाचा रस मिसळावा या मिश्रणाने चेहऱ्यावर लेप करावा. तासाभराने धुवून टाकावा.काही दिवस प्रयोग केल्याने डाग नाहीसे होतील.
  • चेहर्यावरची काळसर झाक दूर करण्यासाठी एक चमचा व्हीनिगर मध्ये अंड्याचा पंधर बलक आणि पिकलेले केळे चांगल्याप्रकारे मिसळावे या पेस्टला चेहऱ्यावर १५ मिनिट लावून ठेवावे नंतर कोमात पाण्याने धुवून टाकावे. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करावा.
  • पिकलेल्या पपईचा तुकडा कापून चेहऱ्यावर राग्डवा. दहा मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा.थोड्याच दिवसात चेहरा उजळून चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या इत्यादी नाहीश्या होतील.
  • बदाम पेस्ट, दुधाची साय व गुलाब पाणी एकत्र वाटून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, मुरुमे जाऊन चेहरा टवटवीत व कांतीयुक्त होतो.
  • त्वचा कांतीयुक्त होण्यासाठी बदामाचं तेल, चंदन तेल, लोणी व मध यांचं मिश्रण त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन रंग उजाळतो.
  • टोमॅटोची पेस्ट करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजेतवानं दिसतो. मुरूम, सुरकुत्या, काळे डाग दूर होण्यास मदत मिळते.
  • एक चमचा साय घेऊन त्यामध्ये दोन केशराच्या कड्या टाकून एक तास हे मिश्रण तसेच ठेवा. जेंव्हा त्या मिश्रणाचा रंग संत्रीसारखा पिवळा होईल तेंव्हा चेहऱ्यावर जिथे जिथे डाग, सुरकुत्या आहेत तेथे 5 ते १० मिनिट हे मिश्रण लावून हलक्या हाताने मालिश केल्यानंतर ३० मिनिट तसेच बसा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धूऊन घ्या. नियमित ७ दिवस हा प्रयोग केल्याने या समस्येपासून आराम मिळेल.
  • चंदन : चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे चंदन. याचा लेप लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. यातील अॅन्टीबॅक्टेरीयल तत्त्व चेहऱ्यावर परिणाम करणारी बॅक्टेरीया नष्ट करून चेहरा उजळ बनवतात. याच्या लेपनामुळे चेहऱ्यावरील तेलग्रंथी कमी करण्यास मदत करतात.
  • लिंबू पाणी : लिंबू पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील मृत पेशी तसेच सर्व प्रकारचे डाग नाहीसे होऊन चेहरा नितळ होतो. यातील अॅसिडने चेहऱ्यावरील ऑईल बॅलेन्स करतो.
  • कोरफड : कोरफडीमुळे चेहऱ्यावरील मॉईश्चर वाढते, चेहरा साफ बनतो. तसेच चेहरा स्मूथ होऊन त्वचा लवचिक बनते.

Leave a Reply