जिरे

जिरे एक मसल्यातील पदार्थ आहे. जेवणाला रुचकर चव आणण्यात जिऱ्याचा वाटा मोठा असतो. जिरे केवळ खाण्यासाठी मर्यादीत नाही तर आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिऱ्याचा उपयोग औषध म्हणून केला जात आहे.

जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शियम, फायबर, झिंक आदींची जास्त मात्रा असते. मेक्सिको, भारत, नार्थ अमेरिका या देशांत जिऱ्याचा जास्त वापर केला जातो.

आयुर्वेदातील विचाराप्रमाणे जिरे बुद्धिवर्धक, पित्तशामक, बलदायक, रुचिकारक, कफनाशक व डोळ्यांना हितकर असतं. पोट फुगणं, पोटात वायू होणं, उलटी, अतिसार, कृमी या सर्व विकांरावर जिरे गुणकारी समले जातात.  जठर, यकृत व आतड्यांना जिर्‍यानं मजबुती येते.

जिरे देखील वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. अलीकडील अभ्यासात जिरेपूड  नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यात मदत करते. शिवाय जिरेपूड, शरीरात चरबी शोषण सेवन कमी करते. एक चमचा जिरे ग्लासभर पाण्यात पाणी रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी उकळवून चहा म्हणून त्याचा उपयोग करा. तर उर्वरित जिऱ्याचे चर्वण करा.

शरीरातील अनावश्यक चरबी बाहेर काढण्यास जिरे मदत करते. तसेच जिरेपूड खल्ल्यानंतर एक तास काहीही खाऊ नका. भाजलेले हिंग, जिरे, काळे मिठ आणि पावडर १-३ ग्रॅम समान प्रमाणात करा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा दह्यासोबत घ्या. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होईल. जिरे शरीरातील रक्ताभिसरण चांगले करते शिवाय कोलेस्ट्रॉल कमी करते.

जिरे स्त्री-पुरुषांच्या आर्तव, शुक्र व मूत्रसंबंधी विकारात तसेच जीभ, आमाशय, लहान आतडय़ाच्या विकारात उत्तम काम देते. रुची उत्पन्न करणाऱ्या पदार्थात जिरेचूर्ण श्रेष्ठ आहे. असे असूनही ते उष्णता वाढवत नाही. उलट पित्त कमी करते.

सर्व प्रकारच्या गॅसवरच्या औषधात जिरे प्रमुख घटक आहे. जिरेचूर्ण ताजेच असावे. ताकाबरोबर घ्यावे.
स्त्रियांच्या पांढरे जाणे, धुपणी या तक्रारीत रात्री एक चमचा जिरे एक कप पाण्यात भिजत टाकावे. सकाळी ते चावून खावे, वर तेच पाणी प्यावे. पांढरे जाणे आठ-पंधरा दिवसांत कमी होते. जीरकाद्यारिष्ट हे तयार औषधही श्वेतप्रदरावर मात करते. पुरुषांच्या लैंगिक दुर्बलता, वारंवार स्वप्नदोष होणे, स्त्री-पुरुषांच्या मूत्रेंद्रियाची आग होणे, कंड सुटणे या विकारात याच प्रकारे जिरे-पाणी घ्यावे. जिरेपाक पौष्टिक आहे.

One comment

Leave a Reply