डोळे येणे

डोळे येणे

उन्हाळ्यात डोळे येणे हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. उन्हाळय़ात गरम हवेमुळे डोळय़ांचे अश्रू वाळतात, कोरडय़ा डोळय़ाच्या तक्रारी जास्त जाणवतात. सतत डोळे चिकटणे, लाल होणे, स्राव पापण्यासह चेहऱ्यावर चष्म्यावर लागणे यामुळे दुसऱ्यांपर्यंत साथ पोहोचू शकते. मुले, युवावर्ग, कामगारवर्ग मुद्दाम लक्ष देऊन स्वच्छता ठेवत नाहीत, यामुळे रोगजंतूंचा फैलाव पटकन होतो. विषाणू आणि  डोळय़ांची साथ हस्तस्पर्श, वस्तूंची देवघेव, घामट वातावरण, कपडय़ांची अदलाबदल किंवा समान वापर उदा. रुमाल यामधून झपाटय़ाने पसरते. पोहणे, खेळ, वाहनामध्ये दाटीने बसणे, एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना हा प्रसार वेगाने सर्वदूर होतो

लक्षणे :-

अचानक डोळे लाल होणे, चिकट द्राव सारखा डोळय़ात साठणे, सतत टोचल्यासारखे वाटणे, दिसण्यात थोडासा धूसरपणा वाटणे, क्वचित डोळा दुखणे, काही वेळा ताप, कणकण वाटणे याबरोबर सर्दी झाल्यासारखे होणे; सुरुवातीला एकाच डोळय़ाला, पण नंतर दोन्ही डोळय़ांना या तक्रारी सुरू होतात. डोळय़ांच्या पापण्यांना आतून पुरळ येणे, छोटे रक्ताचे ठिपके, पापणीला सूज अशी डोळे येण्याची लक्षणे आहेत.

काळजी कशी घ्यावी :-

डोळे आले असल्यास अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये. तसेच डोळ्यांना स्पर्श केल्यास तत्काळ हात धुऊन घ्यावे. त्याचबरोबर ज्या व्यक्तिचे डोळे आले आहेत अशा व्यक्तीचा हातरुमाल, टॉवेल आदींचा वापर करु नये. सर्दी, ताप आल्यास नाक शिंकरल्यानंतर डोळ्याना स्पर्श करु नये.

घरगुती उपचार :-

  • गाईचे कच्चे दुध ड्रोपर ने डोळ्यात टाकावे. २-३ दिवस आंबट-तिखट खाऊ नये.

Leave a Reply