पोटातील गॅस

पोटातील गॅस

           आजकाल पोटातील गॅस होण्याची समस्या साधारण गोष्ट झाली आहे. पोटात जेव्हा गॅस होतात तेव्हा एका ठिकाणी बसणे अशक्य होते.  अनेक कारणे असु शकता. जसे की, पोटात बैक्टीरिया, मसालेदार जेवन, तळलेले अन्न, छोले, फास्ट फूड, ब्रेड. 

           पोटात गॅस होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहीत नसताना हवा गिळण्याची सवय होय. दुसरे कारण म्हणजे काही अन्नपदार्थांवर होणारी जिवाणू प्रक्रिया.

पोटातील गॅसची लक्षणे व त्रास :-
पोटात अस्वस्थता किंवा पोटदुखी, पोट फुगल्याची भावना, भूक मंद होणे वा कमी होणे, अन्न खाण्याची इच्छा न होणे, ढेकर किंवा वात सुटणे, पोटात मळमळ जाणवणे, पोट दाबल्यास दुखणे, अस्वस्थता, पोटाचा घेर वाढणे इत्यादी.

घरगुती उपाय:

         आज आपण किचनमध्ये सहज उपलब्ध असणा-या वस्तुंनी एक काढा बनवणार आहोत.

  • काळे मीठ, जीरा, ओवा, अदरक हे एकसोबत बारीक करा.३०० एमएल पाण्यात हे मिश्रण मिळवा. आता पाणी २०० एमएल होईपर्यंत उकळा. यामध्ये ३-४ पुदीन्याची पाने टाका आणि भांडे झाकुन घ्या. आता हे फिल्टर करुन ब्रेकफास्ट आणि डिनर नंतर सेवन करा. चांगला रिजल्ट मिळवण्यासाठी हा ज्यूस आठवडाभर सेवन करा, तुमची गॅसची समस्या नेहमीसाठी दूर होईल.
  • बैठया जीवनपध्दतीत गॅस होणे स्वाभाविक आहे. काही ना काही व्यायाम करणे हे गॅस निवारण्यासाठी आवश्यक आहे. निदान चालण्याची सवय असावी. ज्या अन्नपदार्थांमुळे गॅस वायू होतो ते टाळावेत.
  • अद्रक : आहारामध्ये अद्रकचा वापर करा. अद्रकमध्ये काही रासायनिक द्रव्य असतात ज्यामुळे तुम्ही गॅसच्या समस्येपासून दूर राहू शकता.
  •  जीरे : जीरं देखील गॅसच्या समस्येवर गुणकारी उपाय आहे. सकाळी थोडीशी जिरे पावडर काहीही खाण्यापूर्वी घ्या. तुम्हाला याचा फायदा होईल.
  • एक गोड सफरचंद घेऊन त्यात १० ग्राम लवंग टोचून ठेवावेत. दहा दिवसांनी लवंग काढून 3 लवंग रोज खावेत. सोबत एक सफरचंद खावे. तांदुळाचे पदार्थ खाऊ नयेत.

Leave a Reply