Site icon घरचा वैदू

सुखदायक उन्हाळा

सुखदायक उन्हाळा

सुखदायक उन्हाळा

वातावरणातील तापमान वाढून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.उन्हाळ्याच्या आहारामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी/द्रव पदार्थ. वातावरणातील उष्णतेमुळे व त्यामुळे येणाऱ्या घामामुळे शरीरातील द्रवांश कमी होत जातो. हा द्रवांश कमी पडल्यामुळे अशक्तपणा, पायाला गोळे येणे, डोळ्यांची जळजळ, मूतखडा, घेरी येणे, लघवीला जळजळ होणे, नाकातून रक्त येणे इ. अनेक तक्रारी जाणवतात.

उन्हाळ्यामध्ये आहारातील द्रव पदार्थ किती महत्वाचे असतात ते आपण जाणतोच , पण तेच द्रव पदार्थ ऋतूनुसार काही बदल करू घेतल्यास जास्त फायदा देतात.कारण कोणताही पदार्थ आपण आहारात कशा पद्धतीने घेतो यावर त्याचे गुणधर्म अवलंबून असतात किंवा त्याचे फायदे अवलंबून असतात .

वातावरणातील उष्णतेचा शरीरावर परिणाम होऊन जास्त त्रास होऊ नये व शरीरातील द्रवांश कमी होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे . उन्हाळ्यात पुढील द्रव पदार्थ घेतल्यास उन्हाळा नक्कीच सुखदायक होईल.

Exit mobile version