हृदय रोग

हृदय रोग

मध्यमवयीन आणि त्याच्या नंतरच्या माणसाला हार्ट अटॅक येणार असेल तर त्याच्या सूचना आधीपासून मिळतात. ती लक्षणं ते धोके वेळीच ओळखले तर नक्कीच या आजारापासून आपण स्वतःला लांब ठेवू शकतो. रक्तदाब, मधुमेह, शरीरातील स्थूलपणा वाढणे, वजन वाढणे आणि असणार्‍या वैयक्तिक सवयी, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थाची सवय, दारुचे अतिसेवन, गुटका खाणे, आणि पाश्चात्यपध्दतीचे अवलंबीकरण म्हणजे फास्ट फूड खाणे वगैरे हे सर्व धोके आहेत. यामुळे हृदय रोग होऊ शकतो.

हृदय रोगाची लक्षणे :- 

  •  चालताना धाप लागणे, श्वास भरुन येणे, छातीमध्ये कळ येणे. विशेष करुन छातीतली कळ ही डाव्या हाताच्या दिशेने जात असेल आणि सोबत दरदरुन घाम येत असेल किंवा मानेकडे ती कळ जात असेल आणि दरदरुन घाम येत असेल, छातीत धडधडतं असे वाटत असेल किंवा गळा आवळल्यासारखे वाटत असेल, श्वास कोंडत असेल ही सर्व हृदयाचा झटका आल्याची प्राथमिक लक्षणे आहेत.

हृदय रोगावर घरगुती उपाय :

  • सफरचंदाचा मोरंबा ५० ग्राम, चांदीचा वर्ख लावून सकाळी सेवन करीत राहिल्याने हृदयाची अशक्तता वगैरे व्याधींवर आराम येतो.
  • अर्ध्या जेवणानंतर अर्धा ग्लास पाण्यात थोडासा आवळ्याचा रस टाकून प्यावा. नंतर बाकी जेवण करावे. २१ दिवस लागोपाठ हा उपाय केल्याने हृदयाचा अशक्तपणा दूर होतो.
  • कच्च्या बटाट्याच्या रसाने हृदयात होणारी जळजळ थांबते. खाडी साखरे बरोबर पिकलेल्या चिंचेचा रस प्यायल्याने पण जळजळ थांबते .
  • ज्यांच्या हृदयाच्या धडकण्याचा वेग सामान्यापेक्षा जास्त आहे , अशा लोकांनी जेवणा सोबत एक कच्चा कांदा खाल्यास आराम येतो व हृदयास ताकद मिळते .
  • वाटलेला आवळा गाईच्या दुधा बरोबर प्यायल्याने हृद्य रोगांमध्ये आराम येतो.
  • कोरडा आवळा व खडीसाखर सम प्रमाणात घेऊन वाटून घेणे. एक चमचा चूर्ण रोज पाण्याबरोबर घेत्क्याने हृदय रोगात फायदा होतो.
  • १५ ग्राम मधात दोन केळी मिसळून खाल्याने आराम येतो. लीची चे फळ उत्तम स्वास्थ्य वर्धक आहे. ते हृदयास शक्ती देते.

Leave a Reply