Site icon घरचा वैदू

कान दुखणे

कान दुखणे

Woman suffering from a headache grimacing and holding her hands to her ears to relieve the throbbing, closeup studio head portrait on white

सर्व वयातील व्यक्तींना काही वेळेला अचानकपणे कानदुखीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामागची कारणे वेगवेगळी असू शकतात.सौम्य प्रकारच्या  कानदुखीमध्ये ‘लसणाचं  तेल’ हा  घरगुती  उपाय  नक्कीच  फायदेशीर ठरू  शकतो.

तेल  ल्युब्रिकंट असल्याने कानदुखी  कमी  करण्यास  मदत  करतात. तर लसणामध्ये दाह  कमी  करण्याची  क्षमता  असल्याने कानदुखीत  फायदा  होतो. सौम्य प्रकारच्या  कानदुखीमध्ये असे तेल १५ मिनिटांत वेदना  कमी  करतात.

घरगुती उपचार :-

  • लसणाच्या दोन पाकळ्या सोलून वाटून घ्याव्या. नंतर त्यात थोडे शुद्ध तिळाचे तेल घालून गरम करावे. आणि गाळून घ्यावे. कोमट झाल्यावर या तेलाचे २-3 थेंब कानात टाकल्याने आराम येतो.केवळ लसणाचा रसदेखील एक  इअर ड्रॉप म्हणून  वापरल्यास कानदुखी  कमी  होण्यास  मदत  होते.
  • तिळाच्या तेलात थोड्याशा ओवा टाकून चांगले गरम करावे. हे तेल कोमट झाल्यावर ४-५ थेंब कानात टाकल्याने कान दुखायचा थांबेल.
  • कांद्याला गरम राखेत भाजून त्याचे पाणी प्यावे. कांद्याचा रस काढून कानात टाकावा.

 

Exit mobile version