Site icon घरचा वैदू

खोकला

खोकला वर घरगुती उपाय

खोकला

कधी बदलत्या ऋतुचक्रामुळे तर कधी धूर,धूळ आणि प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होतो, अशावेळी बाजारात मिळणारी कफ सिरप्स घेतल्याने शरीरावर घातक परिणामांची शक्यता तर असते आणि त्याने दिवसभर झोपही येते मग अशावेळी तुमच्या स्वयंपाकघरातील काही घटकच कोणताही दुष्परिणाम न करता तुमचा सर्दी खोकला दूर करु  शकले तर?

खोकल्यावरील औषधी उपाय :-

 लसूण : लसणात  एन्टीऑक्सिडन्ट गुणधर्म  असून सर्दी खोकल्यावर  ते अत्यंत प्रभावशाली आहे. लसुणामधील  ‘आलाय्झीन ‘ हा घटक  जंतूंचा नाश करतो .

हळद : स्वयंपाकघरातील अत्यंत गुणकारी आणि बहुगुणी हळद सर्दी – खोकल्यापासून चटकन आराम देते.

आयुर्वेदिक काढा : हळदीच्या चहाप्रमाणेच गवती चहा , आलं , लवंग , काळामिरी  व दालचिनी यांचा एकत्र काढा सर्दी खोकला बरं करतो तसेच शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतो.

कंठसुधारक वडी :

आज काल घशातील खवखव, सर्दी यासाठी अनेक गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत मात्र आयुर्वेदाचा उगम असलेल्या भारतात पूर्वीपासून अनेक प्रकारच्या कंठसुधारक वड्या ह्या घरीच बनवल्या जात असत. ज्यामुळे  सर्दी , खोकला सारख्या आजारांवर घरच्या घरीच सहज विजय मिळवता येत असे

कशी कराल कंठसुधारक वडी ?

आलं  बारीक कापून त्याचा रस काढून घ्या त्यात काळामिरीच्या दाण्यांची भाजून केलेली पावडर , थोडे मध व चिमुटभर हळद टाका . हे मिश्रण एकत्र करून त्याचा लहान गोळ्या तयार करा. ह्या गोळ्या १०-१५ मिनिटे  चघळा , असे दिवसातून तीनवेळेस केल्यास तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल .

कफाच्या खोकल्यापासून मिळवा आराम : कफजन्य खोकल्यापासून वेळेत आराम मिळवणे  फार गरजेचे आहे . कफजन्य खोकला हा साध्या संसर्गापासून अगदी  ब्राँकायटिस , न्यूमोनिया व क्षयरोगासारख्या आजाराचे एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे जर तुमचा खोकला आठवडाभरापेक्षा अधिक काळ टिकला तर डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.

 

Exit mobile version