अजीर्ण

अजीर्ण

भूक मंदावलेली असतांना जड पदार्थ खाल्यास अजीर्ण होते.

अजीर्ण वर घरगुती उपाय :-
  • सुंठ, मिरे, लेंडी पिंपळी यांचे चूर्ण प्रत्येकी १/४ चमचा सकाळी-दुपारी-रात्री जेवणानंतर कोमट पाण्यासह घ्यावे. लिंबाचा रस, हिंग, मिरेपूड व जिरे पूड याचाही वापर करावा. जेवणात हलके पदार्थ अल्प प्रमाणात घ्यावेत.
  • भूक न लागणे, अपचन होणे, आंबट ढेकर येणे यावर उपाय म्हणून अर्धा ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून साखर मिसळून नेहमी प्यावे. एक चमचा आल्याचा रस, लिंबू, पादेलोण (सेंधा मीठ) एक ग्लास पाण्यात मिसळून प्यावे.
  • अननसाच्या फोडीवर मीठ व काळे मीठ टाकून खाल्ल्याने अजीर्ण दूर होते.
  • पपई खाल्याने पण अजीर्ण मध्ये आराम येतो.
  • एक चमचा कांद्याचा रस दोन-दोन तासाने घेतल्यास अजीर्ण बरे होते, लाल कांद्यावर लिंबू पिळून जेवताना खाल्यास अजीर्ण दूर होते.
  • लहान मुलांस अजीर्ण झाल्यास पाच थेंब कांद्याचा रस दिल्यास आराम येतो

यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होते व पचनशक्ति सुधारते.

इतर काय काळजी घ्यावी?

हिरवे मूग, मसूर , ज्वारीची भाकरी, भाताची खिचडी यांचा आहारात समावेश ठेवावा.

 

Leave a Reply