अतिसार (हगवण)

अतिसार

अतिसार (Diarrhea) म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. अतिसार म्ह्णजे अन्न्नलिकेची पोट साफ करण्यासाठीची अति हालचाल. पोटात ढवळणं, उलट्या , जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो.

मुळात अतिसाराचा त्रास सुरू झाल्यावर लगेचच काही घरगुती उपाय करता येतात.

  • डाळींबाच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यांत साखर टाकून प्यायल्याने हगवण थांबते.
  • एक पेला नारळाच्या पाण्यात एक चमचा वाटलेले जिरे टाकून प्यायल्याने अतिसारात आराम येतो.
  • पाण्यात उकडलेली कच्ची पपई दोन-तीन दिवस खावी.
  • जायफळ लिंबूच्या रसात उगाळून चाटावे याने शौचास साफ होते व पोटातले वायू नष्ट होतात.
  • एक चमचा लिंबूच्या रसात चार चमचे दुध मिसळून घेतल्यास अर्ध्या तासात आराम येतो.
  • बिन दुधाच्या कपभर गरम चहात अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतल्यानं हगवण नियंत्रणात येण्यास मदत होते.
  • हगवण नुकतीच सुरू झाली असेल तर आयुर्वेदात लंघन म्हणजेच उपवासाचा चांगला उपाय सुचवलेला आहे.
अतिसाराचा त्रास होत असलेल्या व्यक्तींना झपाट्याने अशक्तपणा येतो आणि शरीरातील पाण्याचं प्रमाणही वेगानं घटतं. म्हणून संपूर्ण बेडरेस्ट घेणं गरजेचं असतं. शरीरात पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी दिवसातून चार ते पाच वेळा नारळपाणी घ्यावं. त्याचप्रमाणे अर्धा लीटर पाण्यात चार चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकून केलेलं मिश्रण दिवसातून शक्य तितक्या वेळा घ्यावं. साबुदाण्याची गंजी, तांदळाची पेजही प्यावी. पाणी उकळून थंड करूनच प्यावं. उकळून थंड केलेलं पाणी जास्तीत जास्त वेळा प्यावं. अतिसारात पाणी, विविध सरबते, फळांचे रस, नारळपाण्यासारखे द्रवपदार्थ भरपूर प्यावेत. ताजे व गरम अन्न खावे, उघड्यावरचे बाहेरील खाद्यपदार्थ तसेच शिळे अन्न टाळावं. तसेच अतितिखट पदार्थही काटाक्षाने वर्ज्य करावेत.
कित्येकदा घरगुती उपाय करूनही हगवण थांबत नसेल तर तज्ज्ञ डोक्टरांचा सल्ला घेऊन अवश्यकता असल्यास रुग्णालयात दाखल व्हावं. त्याचप्रमाणे अतिसाराच्या आजारातून बाहेर पडल्यावरही अतिसार पुन्हा उद्भवू नये
म्हणून योग्य काळजी घ्यावी लागते. हगवण थांबली असली तरी खाण्यापिण्याचं प्रमाण एकदम वाढवू नये. टप्प्याटप्प्याने जेवण वाढवल्यास पोटाच्या आतड्यांना होणारा त्रास टाळणं सोपं जातं.

One comment

  • खुपच सुंदर माहिती दिली आहे आणि त्याचा मला खूप खूप फायदा झाला करण मला सुद्धा हगवण (अतिसार ) त्रास होत होता धन्यवाद

Leave a Reply