आव पडणे

गोळा सरकणे

हिवाळा, पावसाळा, उन्हाळा! ऋतू कोणताही असो, आपले आरोग्य उत्तम असेल तर प्रत्येक गोष्टीला आपण सहज सामोरे जाऊ शकतो. खरं तर निसर्गातील बदल हे अतिशय प्रसन्न करणारे असतात. रखरखीत उन्हानंतर पावसाची सर झाडे, वेली फुलांपासून सर्वांना आनंदी क्षण देणारी ठरते. वातावरणातील हा बदल मनाला प्रसन्न करतो खरा; पण शारीरिक आरोग्य साथ देतेच असे नाही. सर्दी, खोकला, ताप, जुलाब होणे इ. कितीतरी आजार ऋतुबदल होताना किंवा झाल्यानंतरही पुष्कळवेळा आढळून येतात.

आव पडणे म्हणजे पोटात मुरडा येऊन कळ येऊन चिकट स्वरूपात शौचास होते. पाय, पोटऱ्या खूप दुखतात. अंधारी येते. हे दूषित पाणी आणि बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाण्याने होते. अचानकपणे असा त्रास झाल्यास त्वरित घरी काही उपाययोजना केल्या तर रुग्णास आराम पडू शकतो.

घरगुती उपाय :-
  • दही भात, खडीसाखरे बरोबर खाल्याने आराम येतो.
  • मेथी दाण्याचे चूर्ण 3 ग्राम दह्यात मिसळून खावे.यामुळे सारखे लघवीस लागणे पण बंद होते.
  • १०० ग्राम धणे बरोबर २५ ग्राम काळे मीठ वाटून घ्यावे. जेवणानंतर अर्धाचमचा फक्की मारून वरून पाणी प्यावे. दोन-तीन दिवसातच आराम येतो.

Leave a Reply