उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर )

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब म्हणजे वय आणि इतर वर्गीकरण केलेल्या रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. याचा अर्थ रक्त धमन्यांमध्ये तणाव निर्माण होणे होय. सामान्यत: रक्तदाब १२०/८० पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. १२०/८० किंवा १३९/८९ च्या दरम्यानचा दाब हा पूर्व उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो. तसंच १४०/९० पेक्षा अधिक असलेला रक्तदाब हा उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो.

उच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. त्याच्यात शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रोग्याला झोप येत नाही.

काय काळजी घ्यावी?

 • धूम्रपान टाळणे.
 • अतिप्रमाणात अल्कोहोलचं सेवन करणं टाळावं.
 • रोज नियमितपणे व्यायाम करावा. शारीरिक व्यायाम करतानाही वेगाने चालणं, मंदगतीने धावणं यासारखे शरीराकडून मेहनत करून घेणारे व्यायाम करायला हवेत.
 • रोजच्या आहारातील मिठाचं एकूण प्रमाण सहा ग्रॅम इतकंच असावं.
 • रोजच्या आहारामध्ये चरबीयुक्त घटक कमी आणि तंतूमय घटक अधिक असणंही जरुरीचं आहे.

उपचार :

 • खसखस आणि टरबुजाच्या बियांचा गर वेग-वेगळे वाटून समप्रमाणात मिसळून ठेवावे. सकाळ-संध्याकाळ रिकाम्या पोटी खाल्याने वाढलेला रक्तदाब कमी होतो व रात्री झोप सुद्धा चांगली लागते.
 • एक चमचा मेथीच्या दाण्याचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ रिकाम्या पोटी घेतल्यास (आठवडाभर ) उच्च रक्तदाब कमी होतो.
 • मनुका सोबत लसणाची पाकळी खाल्याने आराम येतो.
 • फांदीवर पिकलेली पपई तीस दिवस रिकाम्या पोटी खावे, त्यानंतर २ तास काही खाऊ-पिऊ नये.
 • गहू व चणे समप्रमाणात घेऊन दळून घ्यावे. या पिठाच्या पोळ्या खाव्या. एक आठवड्यात आराम येतो.
 • रात्री एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. सकाळी उठून ते पाणी प्यावे. त्याने उच्च रक्तदाब सामान्य होतो.
 • तुळशीची ४ पाने, लिंबाची दोन पाने, दोन चमचे पाणी घेऊन एकत्र वाटावी. रिकाम्यापोटी घेतल्याने उच्च रक्तदाबात आराम येतो.

Leave a Reply