दालचिनी

दालचिनी मसाल्याच्या पदार्थात अत्यावश्यक आहे. यात सिनॅमम नावाचे तेल असते. पाण्यापेक्षा वजनाने हे तेल जड असते. दालचिनी गुणाने तीक्ष्ण, उष्ण, रूक्ष, पित्तकर, वजन घटविणारी, चवीने मधुर व कडवट आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या दालचिनीत तेलाचे प्रमाण फार कमी असते. परदेशांत यापेक्षा चांगल्या दर्जाची गुणवान दालचिनी वापरतात. कोकाकोला या प्रसिद्ध पेयात दालचिनी तेल असते.
दालचिनी ही अपचन, अजीर्ण, मुरडा, आतडय़ाची सूज, पोटदुखी, ग्रहणी, आचके, आर्तवशूल, पित्ताच्या उलटय़ा, मलावरोध, शोष पडणे, वजन घटणे इत्यादी विकारात उपयुक्त आहे. त्वचेला वर्ण सुधारण्याकरिता दालचिनीचा विशेष उपयोग होतो. सर्दी दूर करण्याकरिता दालचिनीचा अर्क कानशिलाला चोळून लावतात.
अनेक प्रकारच्या वातविकारांत दालचिनीचे तेल बाह्येपचारार्थ उपयुक्त आहे. दालचिनीच्या तेलात बुडवलेला कापूस योनीमध्ये ठवून योनिभ्रंश कमी करता येतो. अंग गार पडत असल्यास दालचिनीचे तेल चोळावे, ऊब येते, दालचिनीचे चूर्ण व कात एकत्र करून घेतल्यास आमांशाची खोड मोडते. वरचेवर संडास होणे थांबते. दालचिनी व किंचित सुंठ चूर्ण जेवणानंतर घेतल्यास पोटात वायू धरणे थांबते. पडसे, फ्ल्यू, थंडीताप, खोकला या नेहमीच्या तक्रारींकरिता दालचिनी, व किंचित सुंठचूर्ण जेवणानंतर घेतल्यास पोटात वायू धरणे थांबते. पडसे, फ्ल्यू, थंडीताप, खोकला या नेहमीच्या तक्रारींकरिता दालचिनी, लवंग, सुंठ असा काढा सांज-सकाळ घ्यावा.
सुका खोकला, आवज बसणे, तोंडाला रुची नसणे, कफ सहजपणे न सुटणे, गायक व वृद्ध यांच्याकरिता दालचिनी चूर्ण व खडीसाखर हा उत्तम योग आहे. कडकी, जुनाट ताप, अग्निमांद्य, हाडी मुरलेला ताप याकरिता दालचिनी व वेलची व खडीसाखर चूर्ण असे मिश्रण लहानथोरांनी वापरून पाहावे. कोणत्याही साखरेपासून बनणाऱ्या मिठाईत स्वाद व पाचनाकरिता दालचिनी चूर्ण अवश्य वापरावे. सीतोपलादि या प्रसिद्ध चूर्णातील एक घटकद्रव्य दालचिनी आहे. आयुर्वेदातील अनेकानेक प्राश, अवलेह, विविध टॉनिक औषधांमध्ये दालचिनीचा मुक्त वापर, वेलदोडा, लवंग, तमालपत्र, नागकेशर अशांबरोबर केला जातो. दालचिनीच्या काढय़ांचा उपयोग विविध औषधांचा खल करताना ‘भावनाद्रव्य’ म्हणून केला जातो.

दालचिनीमातेला अनेकानेक प्रणाम!

Leave a Reply