पोटातील कृमि

पोटातील कृमि लहान मुलांमध्ये सामान्यतः आढळून येतात.यामध्ये रोग्याला भूक लागेनाशी होते. आणि भूक न लागल्यामुळे स्वास्थ्य बिघडण्यास चालू होते.
या रोगाची लक्षणे :–
- पोटात दुखणे, उलटी होणे.
- संडासला होत राहणे.
- जास्त भूक लागणे.
- वजन कमी होत जाणे.
पोटात जंत झाल्यावर त्यांची संख्या वाढत जाते. एवढी की लहान आतडे, मोठे आतडे त्यांनी भरून जाते. वाढ व्हायला त्यांना अन्न लागते म्हटल्यावर आम्ही जेवतो त्यावर ते पोसले जातात. जास्त झाल्यावर संडासमधून किंवा उलटीतून बाहेर पडतात. एवढे की नाकातोंडातून ते बाहेर निघतात. औषध दिल्यावर शेकडो जंत बाहेर निघतात. केव्हा केव्हा अंगाला खाज सुटते. थुंकीतून रक्तही बाहेर पडते. केव्हा केव्हा जंतामुळे कॉम्प्लिकेशन्स होतात. आतड्यांना विळखा पडतो. (ऑब्स्ट्रक्शन) राऊंडवर्म एन्सेफेलोपॅथी होते. कावीळ होते. पोटात पडणारा विळखा हे फार मोठं संकट आहे. वर पोटात जर जास्त जंत झाले तर ते आतड्यातून पोटात येतात. पोटात असलेल्या आम्लात ते मरतात व त्याचे रक्तात शोषण होते व ते मेंदूवर आघात करतात. मुले दगावू ही शकतात.
पोटातील कृमि वर घरगुती उपाय :-
- अर्धा चमचा मोहरीची पूड एक वाटी ताज्या दह्यात मिसळून एक आठवडा पर्यंत घेतल्याने पोटातले किडे मारून जातात.
- दोन टोमॅटो, काळी मिरी, मिठा बरोबर निराहार खाल्याने पोटातले कृमि मारून नष्ट होतात.