मुरूम

मुरूम

तारुण्याच्या उंबरठ्यावर मुला-मुलींच्या चेहऱ्यावर मुरुम (पिंपल्स) येतात. चेहर्‍यावरील मुरुमांमुळे मुला-मुलींना त्याची लाज वाटते. बहुतांशी मुला-मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. त्यामुळे ते घराबाहेर पडणे टाळतात. मुरुम घालविण्याकरिता चेहऱ्यावर अनेक प्रयोग केले जातात. मुरुम घालवण्यासाठी काही जण तर महागाडी ट्रीटमेंट घेतात. पण फायदा कोणताही होत नाही. फक्त पैश्याचा अपव्याप होतो म्हणून यावर खात्रीलायक उपाय म्हणजे काही घरगुती उपाय करणे. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम पळवा आणि चेहरा डाग विरहित बनवा.

चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर कोणती काळजी घ्यावी?

  • दिवसातून ३-४ वेळा कोमट पाण्यात चिमुटभर मीठ घालून चेहरा स्वच्छ धुणे, तसेच, चेहऱ्याला कडूनिंबाच्या पाल्याचा रस लावणे, केसात कोंडा होऊ न देणे (केसांना दही किंवा लिंबू लावून केस धुतल्याने कोंडा कमी होतो.) जमल्यास डाळीच्या पीठाने चेहरा धुणे.
  • बद्धकोष्टता होऊ नये म्हणून भरपूर पालेभाज्या, सालासकट फळे, कडधान्ये खावीत. रोज भरपूर व्यायाम करावा.
  • एक कप दुध चांगले आटवावे. दाट झाल्यावर एक लिंबू पिळून हलवत असताना थंड करावे. रात्री झोपताना याला चेहऱ्यावर लावून चोळावे. रात्रभर लावलेले असू द्यावे. सकाळी धुवून घ्यावे. याने मुरूम बरी होऊन चेहरा उजळून तजेलदार होतो.
  • मसूरची डाळ बारीक वाटून दुधात घुसळून घ्यावी आणि चेहऱ्यावर लावावी. दहा मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा. आठवडाभर हा उपाय सकाळ संध्याकाळ करावा.
  • संत्र्याची साले १०० ग्रेम घेऊन वाळवून वाटून चूर्ण करावे. यात १०० ग्रेम बाजरीचे पीठ व १२ ग्रेम हळद मिसळून पाण्यात भिजवून चेहऱ्यावर लावावे. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.काही दिवसात चेहरा उजळून निघेल.
  • गाजराचा रस, टोमेटोचा रस, बीट चा रस २५-२५ ग्रेम दररोज दोन महिने पर्यंत प्याल्याने चेहऱ्यावरची मुरुमे, डाग, सुरकुत्या नाहीश्या होतात.
  • टोमॅटोची पेस्ट करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजेतवानं दिसतो. मुरूम, सुरकुत्या,काळे डाग  दूर होण्यास मदत मिळते.
  • लिंबाचा रस गाळलेला, दोन तोळे गुलाब अर्क, २ तोळे ग्लिसरीन, मिसळून बाटलीत भरून ठेवावे. रात्री झोपताना चेहऱ्यावर चोळून लावावे. वीस दिवस उपचार केल्याने मुरूमपुटकुळ्या दूर होऊन त्वचा मऊ व तजेलदार होते.

Leave a Reply