सर्दी-पडसे

सर्दी

सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो.

सर्दी-पडसे एका जातीच्या विषाणूंमुळे (किंवा काही वेळा वावडयामुळे) होते. हे विषाणू एकापासून श्वासावाटे दुस-याकडे सहज पसरतात. एक-दोन दिवसांत त्यालाही सर्दी सुरू होऊ शकते. या विषाणूंविरूध्द थोडीफार प्रतिकारशक्ती तयार झाली तरी ती अल्पजीवी असते म्हणून, त्याच व्यक्तीला पुन्हापुन्हा सर्दी होऊ शकते.

लक्षणे :-

  • सर्दी-पडशामध्ये नाकाच्या आतल्या आवरणाचा दाह होतो, त्याला सूज येते व त्यातून पाणी वाहते. नाकाचा आतला भाग अशा वेळी  लाल व सुजलेला दिसेल. सुजेमुळे कधीकधी नाकाच्या आतली हवेची वाट अरूंद होऊन श्वासाला त्रास होतो (नाक चोंदणे).
  • सर्दी-पडशात नाकाच्या आतल्या भागाला सूज आल्याने नाकातून कानांत  पोचणा-या कानाघनळीचेही तोंड कधीकधी बंद होते. त्यामुळे कानात विचित्र संवेदना होणे, कान गच्च होणे, दडे बसणे, इत्यादी त्रास होतो.
  • सर्दीच्या पहिल्या दोन तीन दिवसांत नाकातले पाणी पांढरे आणि पातळ असते. नंतर हळूहळू ते घट्ट होत जाते. कधीकधी नंतर होणारा जंतुदोष (जिवाणू) हे या घट्टपणाचे कारण असते. सर्दी-पडशात बारीक ताप येतो.
  • डोके जड होते व दुखते.
  • डोळयातून सारखे पाणी येते.
  • वावडयाच्या सर्दीमध्ये खूप शिंका येतात. नाकातून पाणी गळते. नाक व डोळे यांना खाज येते.

सर्दी- पडसे कमी होण्यासाठी लंघन (उपवास) खूपच उपयुक्त आहे. पंखा, धुरळा किंवा इतर काही विशिष्ट कारण माहीत असल्यास ते टाळण्याचा प्रयत्न करावा. काही लोकांना रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी पिण्याची सवय असते, यामुळेही सर्दी-पडसे होऊ  शकते. थंडी, पावसाळा संपून ऊन तापू लागताना ब-याचजणांना सर्दी होते. ही सर्दी थांबवण्याचा प्रयत्न करू नये; वाहू द्यावी, म्हणजे श्वसनसंस्थेचे इतर भाग (श्वासनळी, फुप्फुसे) निरोगी राहतात. अशी सर्दी औषधांनी दाबण्याचा प्रयत्न केल्यास श्वसनसंस्थेच्या खालच्या भागात स्राव सुरू होतात असा आयुर्वेदाचा अनुभव आहे. म्हणूनच नाकातून सर्दी वाहून जाऊ देणे महत्त्वाचे आहे.

घरगुती उपाय :-

  • रात्री भोजन केल्यानंतर आणि झोपायच्या एक तास आधी एक-दीड ग्लास ताजे पाणी प्यावे, नंतर झोपायच्या १० मिनिटे अगोदर १०० ग्राम गुळ खावा. गूळ खाल्यानंतर मुळीच पाणी पिऊ नये. फक्त चूळ भरावी, सकाळ पर्यंत सर्दी-पडसे बरे होते.
  • रोज सकाळी तुळशीची पाने आणि २ काळी मिरी खाल्याने कधीच सर्दी- पडसे होत नाही.
  • ज्यांना सारखे पडसे होत असते अशांसाठी एक उत्तम उपाय ज्या दिवशी हा उपाय करायचा असेल त्या संध्याकाळी साधे-हलके जेवण करावे त्या आधी २-3 दिवस मसालेदार व तळलेल्या पदार्थांचे सेवन बंद करावे.
  • संध्याकाळच्या जेवणानंतर २ तासांनी रात्री गव्हाच्या पिठात थोडा गूळ टाकून कुटावे. त्यात थोडे तूप टाकून कणके सारखे मळावे. त्याची जाड पोळी लाटून तव्यावर उलटून-पलटून, कपड्याने दाबून शेकावी. चांगली कुरमुरीत शेकून झाल्यावर ताजी गरम खावी. त्यानंतर पाणी पिऊ नये.

Leave a Reply