कफ विकार

प्रत्येक ऋतू बदलतांना हवामानात बदल होत असतो. आणि बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होत असतो.वसंत ऋतूमध्ये उन्हाळयाची तीव्रता कमी असते. ग्रीष्म ऋतूमध्ये ती वाढते. उन्हाळयात खोकला घशाचे विकार, ताप इत्यादी रोग कफामुळे उद्भवतात. म्हणून कफ कमी करणाऱ्या आहाराची आवश्यकता असते.उन्हाळयात तेलकट, तुपकट, लोणी, दूध, तूप इत्यादी स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी करावे. ह्या दिवसांत आहारात धान्याचे प्रमाण वाढवावे. कांदे आणि कडू रसाच्या भाज्यांचे प्रमाण वाढवावे. दही व आंबट पदार्थांचे प्रमाण कमी करावे. फार थंड पेयांनी शरीरीतील कफ वाढतो म्हणून बर्फातील पेय, आईस्क्रीम बेतानेच घ्यावी. आल्याचा रस, मध, इत्यादींचा उपयोग करावा.
कधी-कधी कुठले गरम पेय किंवा गरम औषधाच्या सेवनामुळे कफ वाळून छातीत जम धरतो . असा वाळलेला कफ फार मुश्किलीने निघतो. खोकालतांना किंवा खाकरतांना फार त्रास होतो. छातीतून घर्र-घर्र असा आवाज येतो.
कफ कमी करण्यासाठी खालील उपाय करावे.
- आले सोलून वाटण्या एवढा तुकडा चघळावा. त्याने कफ निघण्यास मदत होते.
- ज्येष्ठमध कोवळा आवळा वेग-वेगळा वाटून घ्यावा. दोघांना गाळून मिसळून ठेवावे. हे चूर्ण एक चमचा दिवसात दोन वेळा किंवा सकाळी रिकाम्या पोटी पाण्याबरोबर घेतल्याने छातीत जमलेला कफ मोकळा होतो.
- कफ जास्त पडत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी सुंठीच्या काढ्यात तयार केलेले एरंड तेल एक ते दोन चमचे घ्यावे .
- जेष्ठ मधाच्या कांड्या चघळल्या तर कफ सुट्टा व्हायला मदत होते .
- लहान बाळांना सर्दी व खोकला झाला असेल तर १ छोटा कांदा (मिळाल्यास पांढरा) बारीक चिरून घ्यावा. तोच कांदा ३ कप पाण्यात उकळत ठेवा. तो काढा उकळून अर्धा झाल्यावर त्याला पिवळा रंग येईल. त्यात थोडी चवीपुरती साखर घालून तो काढा दिवसातून ३-४ वेळा गरम किंवा कोमट करून बाळाला पाजावा. ह्या काढ्यामुले छातीत साठलेला कफ उलटी होऊन किंवा शी मधून बाहेर पडतो. छातीतून येणारा आवाज बंद होतो.
- लहान बाळांच्या छातीत कफ साठून त्रास होत असेल तर २ कप पाण्यात १ चमचा जवस कुटून घालावा. या काढ्यात खडीसाखर घालून उकळून हा काढा कोमट करून ३/४ वेळा बाळांना दयावा. याने कफ बाहेर पडतो.
- खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला दयावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. ह्याने खोकला कमी होतो. (३ वर्षावरील मुलांपासून सगळ्यांना उपयोगी आहे.)
Kanda pandhra nasel tar lal chalel ka