गोळा सरकणे (बेंबी सरकणे )

गोळा सरकणे

गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) म्हणजे बेंबी आपल्या जागेवरून सरकणे. वजन वस्तू उचलताना किंवा जड काम करतांना बेंबी आपल्या जागेवरून सरकू शकते.

घरगुती उपाय :-
  • जेव्हा बेंबी आपल्या जागेवरून सरकून जाते तेव्हा पोटात जोरांत दुखते. जो पर्यंत बेंबी आपल्या मूळ स्थानावर येत नाही तो पर्यंत पोट दुखत असते. यामुळे हगवण पण लागते. पुढे वाकायला व वजन उचलण्यास त्रास होतो. बेंबी जागेवर आणावयास पाहिजे. त्यानंतर दोन्ही पायांच्या अंगठयात जाड काळा दोरा बांधून घ्यावा. त्याने बेंबी चे सरकणे बंद होते.
  • २० ग्राम बडीशोप २० ग्राम गुळात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी घ्यावी. याने सरकलेली बेंबी जागेवर येते.
  • बेंबी वर सरसो तेल चोळल्याने आराम येतो. फार जोरात दुखत असल्यास तेल चोळून त्यावर कापूस ठेवून कापडाची पट्टी बांधावी.

One comment

Leave a Reply