दात दुखणे

दात दुखणे ही खरे तर व्याधी नसून व्याधीचे लक्षण आहे. दात दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. दात किडणे, हिरडय़ा सुजणे, थंड किंवा गरम पदार्थ लागणे यामुळे दात दुखू शकतात. बहुतेक वेळा दात दुखण्याचे मुख्य कारण किड लागणे हे असते. गोड आणि स्टार्च असलेले पदार्थ खाल्ल्याने दातांवर जीवाणू आक्रमण करतात आणि त्यामुळे दात खराब होऊ लागतात. दात किडून त्यात कॅव्हिटिज तयार होतात. अशा परिस्थितीत दातांची योग्य प्रकारे सफाई केली नाही तर त्यांच्यावर थर जमा होतात. त्यात जीवाणू टॉक्सिन्स तयार करतात. त्यामुळे दातांचे अधिक नुकसान होते. किड टाळण्यासाठी गोड आणि स्टार्च असलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करणे हा सर्वात योग्य मार्ग आहे. जेवणानंतर दात घासणे किंवा ते शक्य न झाल्यास योग्य प्रकारे चूळ भरणे असे केल्यानेही किड लागण्याची शक्यता कमी होते. दातांवर काळपट डाग दिसू लागले, खाद्यपदार्थ अडकू लागले किंवा थंड आणि गरम पदार्थांनी दातांना ठणका लागू लागला की किडीला सुरूवात झाली असे समजावे. सुरूवातीला कॅव्हिटिज भरून (फिलिंग) ही प्रक्रिया थांबवता येते.
दातदुखीच्या दुखण्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण पेनकिलर घेतात पण त्या टाळणेच हितकारी आहे
काही घरगुती उपायांनीच कशी कराल तात्काळ दातदुखीपासून सुटका :-
- दातदुखीपासून सुटका करण्यासाठी लवंगाच्या तेलाचे थेंब कापसाच्या बोळ्याने दुखणार्या दातावर लावावे. लवंगाचे तेल हा दातदुखी दूर करण्यास फारच उपयुक्त आहे. तेलाऐवजी तुम्ही लवंगाची पावडर वापरू शकता. मात्र लवंग घरात नसल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. लवंगाऐवजी तुम्ही सुंठाची पावडरदेखील वापरू शकता. सुंठाची पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट दुखणार्या दातावर लावा. यामुळे दातदुखीपासून तात्काळ आराम मिळेल.
- सुंठ पावडर नसल्यास आल्याचा लहानसा तुकडा चघळत रहा. व आल्याचा रस दुखणार्या दाताकडे वळवण्याचा प्रयत्न करा.आल्यातील जंतूनाशक घटकांमुळे जर दातात लहानसा संसर्ग झाला असल्यास त्यापासून आराम मिळतो. तसेच दाह व जखमा कमी होण्यास मदत होते.तात्पुरती दातदुखी कमी करण्यासाठी तुम्ही हा उपाय दिवसभरात 2-3 वेळा करू शकता. मात्र वेळीच वेदना कमी न झाल्यास डेंटिस्टकडे जा.
- दात दुखल्यास थोडासा कापूर दुखणाऱ्या दाताखाली ठेऊन दाबावे , दाढेत खडडा असेल तर त्यात भरून ध्यावे . वेदना बंद होतात .
- दात दुखी असल्यास कच्च्या पपई चे दुध , थोडेसे हिंग आणि कापूर मिसळून कापसाच्या बोळ्याने दुखऱ्या दातात ठेवून दाबावे .
- लिंबाचा ताजा नरम पाला घेऊन त्याचा रस ज्या बाजूची दाढ दुखत असेल त्या बाजूच्या कानात २ थेंब टाकावे . लगेच आराम येतो .
खुप छान माहीती आहे