मेंदूची ताकद वाढवा

मेंदूची ताकद वाढवा

‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही ह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही. आपले मूल सर्व क्षेत्रात उत्तम गुण मिळवून यशस्वी व्हावे असे स्वप्न सर्वच आई-वडील पाहात असतात. बौध्दिक विकासासाठी किंवा स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आज बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत व दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. त्यापैकी नेमकी कोणती औषधे घ्यावी किंवा कोणते उपचार करावे हे कळेनासे होते. आपले उत्पादन कसे सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याची तर जणु चढाओढच लागलेली असते. अशा वेळी कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर ठेवू नये हे कळेनासे होणे स्वाभाविक आहे. अशा उत्पादनांपैकी काय घ्यावे, किती प्रमाणात घ्यावे ह्या औषधांशिवाय आणखी काय उपाय आहेत, आहार काय असावा, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे,

मेंदूची ताकद वाढविण्यासाठी घरगुती उपाय :-
  • १ किलो गाजर किसून , चार किलो दुधात उकळावे . त्यात २५० ग्राम शुध्द तूप आणि दहा बदाम टाकून भाजावे . आणि काचेच्या भांड्यात भरून ठेवावे . रोज ५० ग्राम खाऊन वरून दुध प्यावे . एक महिना लागोपाठ घेतल्याने मेंदूची ताकद वाढते.
  • जेवणात अँटिऑक्सिडंट आणि फ्लेव्होनॉइडचे प्रमाण वाढवा. या घटकांमध्ये आजारांशी लढण्याची ताकद असते. यासाठी आहारात अ, क आणि ई जीवनसत्त्व असलेले पदार्थ उदाहरणार्थ अंडी, गाजर, ब्रोकोली, मासे, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे प्रमाण वाढवावे. यामुळे मेंदूच्या पेशींची झीज कमी होईल.
  • शरीरात फ्लेव्होनॉइडचे प्रमाण वाढवण्यासाठी काळी द्राक्षे, कांदा, सफरचंद, ग्रीन टी, ब्लॅक टी यांचे सेवन करावे.
  • मेंदूसाठी ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड लाभदायक ठरते. यासाठी मासे, मोहरीचे तेल, सोयाबीन, अक्रोड, जवस या पदार्थांचे सेवन करा. जवसात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण सर्वाधिक असते. ब-1 जीवनसत्त्वामुळे चेतासंस्था उत्तम राहते. स्मरणशक्ती वाढते. एकाग्रता वाढते.
  •  एक सफरचंद आगीत भाजून पाण्याच्या कळशीत सोडावे . हे पाणी गाळून प्यावे .
  • धणे , खसखस समप्रमाणात घेऊन कुटून घ्यावे व बारीक चूर्ण करावे . तेवढ्याच प्रमाणात खडीसाखर वाटून त्यात मिसळावी . एक-एक चमचा चूर्ण सकाळी ९ वाजता व जेवणानंतर रात्री ९ वाजता कोमट गोड दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर नियम पूर्वक घ्यावे . यामुळे स्मरणशक्ती, नेत्रज्योती वाढते आणि गाढ झोप लागते .

Leave a Reply