आम्लपित्त (एसिडीटी)

आम्लपित्त

अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली , अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात . तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ ,उलट्या होणे ,अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात . मग  पित्तावर  उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली  विविध रूपातील  ‘एन्टासिड्स’(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात , तेव्हा घरचा वैदू चे हे काही घरगुती उपचार नक्की आजमावून पहा .

उपचार :-
  •  आरामदायी केळं : केळ्यातून शरीराला  उच्च प्रतीच्या  पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल (acid ) निर्मितीची प्रक्रिया मंदावते . तसेच ‘फायबर’  शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते.

                    – पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून                       काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.

  • फायदेशीर तुळस : तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या  विषारी घटकांपासून बचाव करते.       

              – तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा .

  •  अमृतरुपी दुध : दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक  आम्ल निर्मिती थांबते व अतिरक्त आम्ल दुध खेचून त्याचे अस्तित्व संपवते . थंड दुध  प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते.  

                – दुध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे . मात्र त्यात चमचा                 भर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.

  •   बहुगुणी बडीशेप: बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते . बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते.

                    –  बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास  मदत होते. तसेच                      पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास , बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले                        पाणी प्यायल्याने आराम मिळतो.

  • पाचक जिरं : जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते , ज्यामुळे पचन सुधारते , मेटाबॉलीझम  सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात .  

                –  जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील आराम मिळतो . किंवा तुम्ही  जिऱ्याचे दाणे पाण्यात                       उकळून ते पाणी  थंड करून प्या.

  • स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग : लवंग चवीला तिखट असली तरीही  लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते , पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते . लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार  दूर होतात.

               – जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा , त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात                राहू द्या . यारसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.

  • औषधी वेलची: आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते . स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण  वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो.

                 – पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट / सालीशिवाय ) ती पाण्यात                          टाकून उकळा , हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल .

  • वातहारक  पुदिना : पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो . पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते .

पित्ताचा त्रास होतअसल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा . थंड झाल्यावर हे पाणी                     प्या. अपचनावरदेखील पुदिना गुणकारक आहे. पुदिन्यातील ‘मेन्थॉल’ पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा                   त्रास , डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.

  • आल्हाददायक आलं : आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो . आल्याच्या सेवनाने पचन सुधारते . तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो . आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते.

– पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट                      लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या . किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावरथोडा                      गुळ  टाकून चुपत रहा.

  •  पित्तशामक आवळा : तुरट , आंबट चवीचा आवाळा  कफ आणि पित्तनाशक असून त्यातील ‘व्हिटामिन सी’ , अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते .

– रोज चमचाभर आवळ्याची पावडर / चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही .

– कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात.

  • हरड: आम्लापित्तासाठी हरड श्रेष्ठ औषध आहे. लहान काळी हरडीचे चूर्ण दोन ग्राम व दोन ग्राम गुळ मिसळून सायंकाळी जेवणानंतर खाऊन पाणी प्यावे. आठवडाभर सेवन केल्याने एसिडीटी पासून आराम येतो.
  • लिंबाचा रस: कोमट पाण्यात मिसळून सायंकाळी प्यायल्याने एसिडीटी कमी होते. एक कप गरम पाणी व एक चमचा लिंबाचा रस एक-एक तासाने तीन वेळा घेतल्यास लवकर आराम येतो.

Leave a Reply