कारळे

        कारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक जिन्नस आहे.

खुरासानी, कारळे, काळे तीळ, रामतीळ या विविध नावांनी जिऱ्यासारखे पण आकाराने मोठे तीळ बहुधा सर्वाना अतिशय रुचकर चटणीकरिता माहीत आहेत. कारळ्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी ज्यांच्या आहारात आहे, त्यांना मलावरोध, मूळव्याध, मूतखडा, मूत्रकृच्छ किंवा लघवीची आग या विकारांत पथ्यपाण्याची फिकीर करावयास नको.
कारळे नुसते स्निग्ध नसून पौष्टिक व त्याचबरोबर वातशमन करणारे आहेत. पक्वाशयात अपानवायूचे कार्यक्षेत्र. त्या क्षेत्रात लघवी, मलप्रवृत्ती, आर्तवप्रवृत्ती यांचे योग्य वेळी, योग्य प्रमाणात अनुमोलन कारळ्याची चटणी करील.

कारळ्याची चटणी खूप तिखट करू नये. सोबत कुटलेले तीळ दिल्यास पौष्टिक अंश वाढतो. कारळे व तीळ यांची एकत्र चटणी बाळंतिणीचे दूध वाढवायला मदत करते. कारळ्याचे तेल तीळ तेलाच्या अपेक्षेत अधिक कृमीनाशक व उष्ण आहे.

Leave a Reply