डोकेदुखी

डोकेदुखी

डोकेदुखी ही सामान्यपणानं जाणवणारी वेदना लहान बाळापासून वृध्द व्यक्तीपर्यंत सर्वांनाच जाणवते आणि मग त्या ठणकणार्या वेदनांना शांत कसं करावं हेच समजत नाही. डोकेदुखीची कारणं अनेक आहेत. तणावामुळे, ऍलर्जीमुळे, वातावरणातल्या बदलामुळे, पित्तामुळे हा त्रास होतो. सर्वात जास्त दुर्लक्ष केला जाणारा आजारही हाच आहे. काही वेळा होईल बरं आपोआप म्हणून दुर्लक्ष होतं तर काही वेळा एखादी वेदनाशामक गोळी घेऊन काम भागवलं जातं.

साधारण डोकेदुखी असल्यास खालील उपाय केले पाहिजेत-

  • एका बात्ताशावर ४ थेंब अमृतधारा टाकून खावे. २ थेंब रुमालावर अमृतधारा शिंपडून हुंगत रहावे.
  • लिंबाच्या पानाचा रस नाकपुड्यात सोडल्याने डोकेदुखी थांबते.
  • चंदन पाण्यात उगाळून कपाळावर लेप केल्याने उन्हाने होणारी डोकेदुखी थांबते.
  •  तिळाचे तेल २५० मि.ली.,चंदनाचे तेल १० मि.ली.,दालचिनीचे तेल १० मि.ली. आणि कापूर या सर्वांना मिसळून बाटलीत भरून ठेवावे.हे तेल डोक्यास लावल्याने डोकेदुखीत लगेच आराम मिळतो.
  • दोन चमचे आवळ्याच्या चूर्णात एक चमचा शुध्द तूप मिसळून खावे,वरून एक पेला कोमात दुध घ्यावे.
  • रोज सकाळी रिकाम्यापोटी एक सफरचंद कापून,मीठ लावून चावून खाल्याने जूनी डोकेदुखी दूर होते.हा प्रयोग दहा दिवस लागोपाठ करावा.

सततची डोकेदुखी असेल तर सकाळी उपाशीपोटी सफरचंदावर मीठ टाकून ते खावं. त्यानंतर कोमट दूध किंवा पाणी प्या. हा उपचार सातत्यानं दहा किंवा पंधरा दिवस करा.

सायनसचा त्रास असेल तर पाण्यात सुंठपूड किंवा ताजं आलं घालून त्याची वाफ घ्यावी.

डोकेदुखीचा त्रास खूप जुना असेल तर रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात पाय बुडवून बसा. असा शेक सलग पंधरा दिवस घ्या.

नीलगिरी तेलाचे थेंब टाकलेल्या पाण्याची वाफ घ्या.

दालचिनी पूड पाण्यात कालवून लेप कपाळावर लावा.

लिंबाची सालासकट दाट पेस्ट करून त्याचा जाडसर लेप कपाळावर लावा. (डोळ्यात रस जाऊ न देता)

200 मिली पालक रस आणि 300 मिली गाजर रस एकत्र करून नियमीतपणानं घेतला तर मायग्रेनसारख्या डोकेदुखीवर उपाय करता येतो.

डोकेदुखी टाळण्यासाठी :- आहारावर लक्ष द्या, जेवणाच्या वेळा नियमित असू द्या. सतत डोकेदुखी असेल तर नियमितपणानं केळं खा. तणावमुक्त जगण्याचा प्रयत्न करा. नियमितपणे प्राणायाम करा. यामुळे तणावापासून मुक्ती मिळेल आणि डोकेदुखी कमी होईल. डोकेदुखीची सुरुवात झाल्या झाल्या काहीतरी गोड खा. अगदी चमचाभर साखर खाल्ली तरीही चालेल. गोडामुळे डोकेदुखी कमी होते आणि बर्याचदा ती थांबतेही. भरपूर पाणी प्या. रेड मीट, क्रीमयुक्त पदार्थ, चीज आणि पचायला जड पदार्थ खाणं टाळा. तळलेले पदार्थ आणि जंकफूड टाळा. आहारात चोथायुक्त पदार्थांचा आणि फळांचा समावेश वाढवा. आहारात ब 12, क, ड आणि प्रथिनं, चुना यांचा समावेश वाढवा. पुरेशी झोप घ्या. अपुर्या झोपेमुळेही सततची डोकेदुखी मागे लागण्याची शक्यता असते.

Leave a Reply