डोळ्याखालचे काळे घेरे

डोळ्याखालचे काळे घेरे

तुमच्या डोळ्याखाली काळे घेरे असणे सर्वसामान्य बाब झाली आहे. महिलांबरोबर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. याच मूळ कारण आहे, धावपळ आणि जास्त जागरण. ज्यांना आराम मिळत नाही, जे तणावग्रस्त असतात त्यांना या समस्येंने ग्राहसलेले आहे. त्यामुळे या समस्येमुळे तुमचा स्मार्टनेस कमी होतो.

कारणे :-

डोळ्याखाली काळ वर्तुळ होणे हा  आपल्या बदल्या जीवनशैलीचा भाग आहे. जास्त काम करने, तणावात राहणे, झोप पुरी न होणे तसेच पोट खराब असणे, संतुलित भोजन घेणे, मानसिक ताण, लीव्हर खराब असणे इत्यादी कारणांमुळे डोळ्याखाली काळे घेरे पडतात. ही कारणे दूर केल्याने हळू-हळू हे काळेपण कमी होत जाते.

उपाय :- 

  • टॉमेटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. त्वचेला ग्लो प्राप्त होता. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाटा रस (काही थेंब) एकत्र करुन मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे. दोन मिनीट ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून काढा.
  • बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत. डोळ्याजवळी त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्याखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर तोंड धुवावे.
  • डोळ्याखालील काळे घेरे घालविण्यासाठी काकडीचे गोल काप म्हत्वाची भूमिका बजावते. तसेच डोळांना आरामही मिळतो. काकडीची काप चांगले क्लिंनजर आहे. डोळ्यांखाली काळे वर्तुळ जाण्यास मदत करते. काकडीची गोल खाप करुन दिवसातून दोन ते तीन वेळा १० मिनिटे ठेवा.
  • दररोज दुधाची साय काळ्या घेऱ्यावर नियमितपणे लावावे.
  • कच्चा बटाटा मधोमध कापून डोळ्यांवर ठेवून लेटावे . अर्ध्यातासानंतर पाण्याने धुवून घ्यावे.
  • गाजराच्या मौसमात गाजर किसून घेऱ्यांवर लावावे. १५-२० दिवस हा उपाय करावा.

Leave a Reply