लहान मुलांमधील पोटदुखी

लहान मुलांमधील पोटदुखी

लहान मुलांमध्ये पोटदुखीची समस्या सर्रास आढळते. अशावेळी अचानक मुलं रडायला लागतात. या वेदना तीव्र  असल्याने मुलांना आणि पर्यायाने पालकांनाही त्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी अधिक प्रमाणात हवा श्वसनाच्या मार्गाने आत घेतल्यास आतड्यांचे आकुंचन होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी पोटदुखीची समस्या वाढते.

लहान मुलांमधील पोटदुखीसाठी उपाय :-
  • जुलाब होत असतील तर १ ग्लास स्वच्छ पाण्यात १ चमचा साखर आणि आणि चिमुटभर मीठ घालून हे पाणी सतत मुलांना पाजावे.
  • अपचन झाले असेल तर थोडया पुदिन्याच्या पानांचा रस काढून १ चमचा रस, तेवढेच मध आणि चिमुटभर काळे मीठ घालून दिवसातून ३ ते ४ वेळा चाटायला दया.
  • पोटात कळा येत असतील तर १ चमचा आल्याचा रस, १ चमचा मध आणि चिमुटभर मीठ घालून हे ३-४ वेळा चाटायला दया.
  • लहान बाळाचे पोट दुखत असेल आणि विव्हळून रडत असेल तर आईने ओवा खाऊन बाळाच्या पोटावर फुंकर मारावी किंवा कापडात ओवा घालून त्याची पोटली तव्यावर गरम करून पोट शेकावे.
  • पोटात जंत झाले असतील तर वावडिंग उकळवून पाणी दयावे किंवा वावडिंगाची पूड व गुळ एकत्र करून त्याच्या छोटया आकाराच्या गोळ्या करून दिवसातून ३ वेळा दयाव्यात. जंत पडून जातात.
  • जिरे व सैंधव मीठ समप्रमाणात एकत्र करून त्यात ते भिजेपर्यंत लिंबाचा रस घालून ७ दिवस काचेच्या बाटलीत भिजत ठेवावे. हे मिश्रण नंतर उन्हात वाळवून बाटलीत भरून ठेवावे. पोटदुखी, गासेससाठी हे उत्तम औषध आहे.
  • अर्धा चमचा हिंग पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा. पोटाजवळ  हलक्या हाताने या पेस्टने मसाज करा. मात्र ही पेस्ट बेंबीत जाणार नाही याची काळजी घ्या. बेंबीजवळील पेस्ट कापसाच्या ओल्या बोळ्याने पुसा. पाण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा तीळाच्या तेलातही हिंग मिसळून पेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते. पेस्ट लावल्यानंतर थोडा वेळ ती थंड होऊ द्यावी तसेच सुकू द्या. काही वेळाने दुखणे थांबते.

Leave a Reply