पोट दुखणे

पोट दुखणे

कधी-कधी अवेळी जेवण झाल्याने पोट दुखते. लहान मुले व वयस्करांना पोटदुखीचा त्रास जास्त होत असतो. पोट दुखत असेल तर घरगुती उपचार सोडून औषधी गोळ्या घेतो. परंतु, त्याने तात्पुरता आराम मिळतो व पुन्हा जैसे थे अवस्था होते. घरगुती उपाचाराने पोटदुखी तर दूर होऊन पचनक्रियाही सुरळीत होत असते.

पोट दुखीचा त्रास कमी करण्याचे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत :-

  • वातामुळे पोट फुगल्याने पोटावर ताण वाढतो. त्यामुळे पोट दुखते. ओवा आणि काळे मीठ वाटून दोन्ही समप्रमाणात मिसळून ठेवावे. हे मिश्रण १ चमचा कोमात पाण्या सोबत घेतल्याने अधोवायू निघून जातो व पोट दुखी थांबून जाते.
  • अमृत धाराचे ३-४ थेंब बताशा मध्ये टाकून खाल्याने पोटदुखीत आराम येतो.
  • अजीर्ण झाल्यामुळे पोट दुखत असेल तर १० ग्राम मोहरी एक कप पाण्याबरोबर न चावता गीळल्यास पोट दुखी थांबते.
  • दहा ग्रॅम गुळ व अर्धा चमचा खायचा चुना एकत्र करून त्याची एक गोळी तयार करावी. ही गोळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊन थोडी झोप घ्यावी. थोड्याच वेळेत पोटदुखीवर आराम पडेल.
  • जर पोट फारच जोराने दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते.
  • अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एकत्र करून थंड पाण्यासोबत घेतल्याने पोट दुखणे थांबण्यास मदत होते.
  • अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये थोडेसे पादरे मीठ टाकून प्यायल्याने पोट दुखी थांबते.
  • बिना दूधाचा चहा (कोरा चहा) प्यायल्यानेदेखील पोट दुखणे थांबते. त्यात थोडा लिंबाचा रस टाकल्यास लवकर असर होतो.
  • एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा एकत्र करून प्यायल्याने पोट दुखी लगेच थांबते.
  • चांगल्या प्रकारे शिजलेले तांदूळ एका कॉटनच्या कपड्यात बांधून शेकल्यास पोट दुखी थांबते.
  • एक ग्लास पाण्यामध्ये थोडासा गोड सोडा टाकून प्यायल्याने पोट दुखणे थांबते.
  • सुंठ, जीरा आणि काळी मिरी सम प्रमाणात घेवून त्याचे चूर्ण बनवून घ्यावे. गरम पाण्यासोबत एक चमचा हे चुर्ण घेतल्याने पोट दुखणे थांबते.

Leave a Reply