क्षय रोग (टी.बी.)

क्षय रोग

विद्यमान औषधांना दाद न देणार्‍या क्षय रोगाचा वाढता प्रार्दूभाव ही सध्याच्या घडीला मोठी चिंतेची बाब आहे. त्यावर प्रभावीपणे मात करण्यासाठी औषध विषयक नवीन धोरण आखण्याची गरज क्षयरोगविषयक वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.

देशात सध्या 40 टक्के लोक क्षयरोगाच्या छायेत आहेत असा अंदाज आहे. कोणत्याही कारणाने प्रतिकारशक्ती कमी झाली तर अशा धोकादायक लोकांना क्षयरोगाची लागण होण्याची भीती असते. एच.आय.व्ही., मधुमेह, कर्करोग, श्वसनरोग इत्यादींच्या प्रादूर्भावाने तसेच झोप न येणे, धूम्रपान, मद्यपान आदी गोष्टींमुळे व सतत दगदगीची जीवनशैली यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. अशावेळी क्षयरोगाची लागण होण्याची शक्यता वाढते.

शिंकल्यावर , खोकल्यावर क्षयरोगाचे जंतू हवेत पसरतात. या हवेत श्वास घेत असलेल्या व्यक्तींच्या शरीरात हे जंतू जातात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत कमी असल्यास किंवा जंतूंचा जोरदार हल्ला झाल्यास व्यक्तीला टीबी होण्याची शक्यता असते.सुरूवातीच्या काळात हा फुफ्फुसात आढळतो. मात्र त्याची तीव्रता वाढल्यास टीबी फुप्फसापुरता मर्यादित न राहता तो शरीरात सांधे, मणका, मेंदू अशा फुप्फुसाव्यतिरिक्त शरीरातील इतर भागात देखील पसरू शकतो. ज्याला एक्स्ट्रापलमनरी टीबी म्हणतात.

क्षय रोगाची लक्षणे :-

  • खोकला – तीन आठवड्यांहून अधिक असलेला खोकला. हे क्षयरोगाचे एक  प्रमुख लक्षण आहे.
  • कमी होणारे वजन
  • थकवा – अशक्तपणा किंवा थकवा हे क्षय रोगाचे सामान्य लक्षण आहे.
  • श्वास घॆण्यास त्रास होणॆ – फुफ्फुसात संसर्ग झाल्याने श्वास घेण्यास त्रास होतो.
  • रात्री येणारा घाम
  • भूक न लागणे
  • थुंकीतून रक्त येणे हे क्षय रोगाचे एक लक्षण आहे. कफाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो.

क्षय रोग होण्याची जास्त शक्यता असलेले लोक :-

  • जास्ती वय असलेले
  • लहान बाळे
  • दुसऱ्या कोणत्यातरी कारणांनी ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आहे असे
  • कमी पोषकता
  • दारूच्या आहारी गेलेले
  • जास्ती गर्दीच्या ठिकाणी राहणारे
  • गरीब लोक
  • अस्वच्छतेत राहणारे

आजारपणातील घ्यावयाची काळजी :-

  • खोकताना तोंडावर हातरूमाल धरणे.
  • खूप कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक (डेटॉल, सेव्हलॉन, इ.) घालून त्यातच थुंकावे; इतरत्र कुठेही न थुंकणे महत्त्वाचे.
  • रुग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी
  • लहान मुलांचा व रुग्णाचा संपर्क टाळणे
  • घरात इतरांनीही टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते.

क्षय रोगावर घरगुती उपाय :-

  • लसूण सोलून, वाटून पाण्यास मिसळून ठेवावे. रोग्यास २-3 चमचे दिवसात 3 वेळा दिल्यास या रोगात फायदा होतो.
  • क्षय रोग्यास फ्लॉवर (कोबी ) चे सूप पाजल्याने आराम येतो.
  • मनुका, पिंपळ, खडीसाखर समप्रमाणात वाटून एक चमचा सकाळी-संध्याकाळी खाल्याने क्षय रोगात आराम येतो.

Leave a Reply